वेव्हज ओटीटी मंचामुळे एक नवीन डिजिटल चळवळ सुरु होत आहे-गौरव द्विवेदी

वेव्हज ओटीटी मंचामुळे एक नवीन डिजिटल चळवळ सुरु होत असून त्याद्वारे ग्रामीण भागातल्या निर्मात्यांनी तयार केलेला पारंपरिक आशय देखील जागतिक स्तरावर पोचेल असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे. कंबोडियात सियाम रीप इथं सुरु असलेल्या २० व्या आशिया माध्यम शिखर परिषदेत वेव्ह्ज ओटीटी मंचाबद्दल सादरीकरण करताना ते आज बोलत होते. या मंचावरचा आशय जगभरातल्या संस्था, जनसमुदाय आणि धोरणकर्त्यांपर्यंत पोचू शकतो. त्यामुळे सार्वजनिक सेवा प्रसारणकर्त्यांनी स्वतःचे निरनिराळे ओटीटी मंच तयार करण्यापेक्षा एकाच मंचावरून सर्व सेवा द्याव्यात असं ते म्हणाले.  

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.