भारतीय हवाई दल उद्यापासून फ्रान्समध्ये होणाऱ्या आठव्या ‘गरुड-25’ या द्विपक्षीय हवाई सरावात सहभागी होणार आहे. भारतीय हवाई दल येत्या २७ नोव्हेंबर पर्यंत फ्रेंच हवाई आणि अंतराळ दलाबरोबर या सरावात सहभागी होत आहे. वास्तववादी वातावरणात युद्ध तंत्र आणि प्रक्रियेमध्ये सुधारणा करणं, हे या सरावाचं उद्दिष्ट असल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
या सरावांमुळे दोन्ही देशांच्या हवाई दलांना व्यावसायिक परस्पर संवाद, परिचालनाबाबतचं ज्ञान, आणि परस्परांच्या सर्वोत्तम पद्धतींची देवाण-घेवाण करण्याची संधी मिळेल, असं यात म्हटलं आहे.
या सरावादरम्यान, भारतीय हवाई दलाची सुखोई-30MKI लढाऊ विमानं फ्रेंच मल्टीरोल लढाऊ विमानांबरोबर हवेतून हवेत मारा करणं, हवाई प्रतिरोध आणि संयुक्त स्ट्राइक ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित करत, जटिल हवाई युद्धाचा सर्व करतील, असं यात म्हटलं आहे.
Site Admin | November 15, 2025 8:00 PM | Garuda 25 in France from Sunday
भारतीय हवाई दल फ्रान्समध्ये होणाऱ्या आठव्या ‘गरुड-25’ या द्विपक्षीय हवाई सरावात सहभागी होणार