गंगा संवर्धन हा केवळ एक पर्यावरण उपक्रम नसून तो देशाचा सांस्कृतिक वारसा, श्रद्धेशी निगडीत आहे तसंच लाखो लोकांचं जीवन गंगेवर अवलंबून आहे असं केंद्रिय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी म्हटलं आहे. गंगा पुनरुज्जीवन अधिकृत कृती दलाच्या 16 व्या बैठकीत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. या बैठकीत नियामावली आणखी कठोर करणे तसंच पूररेषा निश्चित करणे यावरही चर्चा करण्यात आली.