राज्यातल्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी यंदा रेल्वेनं गाड्यांच्या ३६७ अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. यासाठी गणेशभक्तांच्या वतीनं आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या जादा गाड्या सोडाव्यात अशी मागणी महाऱाष्ट्र शासनानं केंद्रीय रेल्वे मंत्री आणि भारतीय रेल्वेकडे केली होती. त्याला प्रतिसाद देत, गणेशभक्तांच्या सोयीसाठी रेल्वे गाड्यांच्या जादा फेऱ्यांचं नियोजन केलं जाईल, असं आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी पत्राद्वारे दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
Site Admin | August 19, 2025 7:58 PM | Ganeshotsav | Railway
गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या जादा गाड्या
