गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. आधी जाहीर करण्यात आलेल्या २९६ गणपती विशेष रेल्वे गाड्यांव्यतिरिक्त या ६ गाड्या चालवण्यात येणार असून यामुळे आता गणपती विशेष रेल्वेगाड्यांची एकूण संख्या ३०२ झाली आहे. या गाड्यांसाठीचं आरक्षण पुढच्या महिन्यात ५ तारखेपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसंच www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
Site Admin | July 31, 2025 7:30 PM | Ganeshotsav2025 | Railway
गणेशोत्सवासाठी ६ अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्या धावणार !
