डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 9, 2024 1:37 PM | Ganpati Festival

printer

गणेशोत्सवाचा उत्साह देशाच्या कानाकोपऱ्यात

देशात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळत आहे. महाराष्ट्राबाहेरही गणेशोत्सव उत्साहाने साजरा होतो. उत्तर प्रदेशातल्या कानपूर इथं महाराष्ट्र मंडळाकडून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. शंभर वर्षांची परंपरा असलेलं हे मंडळ मराठी पद्धतीनं गणपतीची पूजा अर्चना करतं. कानपूरमधले अनेक मराठी कुटुंबं या उत्सवात भक्ती भावानं सहभागी होतात. १९१९ साली महाराष्ट्र मंडळानं गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली होती. 

पुण्यातून सुरू झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय झाला आहे. विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीने साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. आकाशवाणी मुंबईवरून रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये, दररोज. तेव्हा ऐकायला विसरू नका, आंतरराष्ट्रीय गणेशोत्सव आकाशवाणीवर.