पर्यावरणाच्या दृष्टीनं मोठ्या मूर्तींंचं विसर्जन समुद्रातच करण्याचं राज्य शासनाचं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती समुद्रात विसर्जित करण्यात येतील, असं प्रतिज्ञापत्र आज राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं. तसंच, विशिष्ट उंचीच्या घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येईल, असंही या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलं आहे. पीओपी मूर्तींवरच्या बंदीसंदर्भात राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन केला होता. या गटाने काही शिफारसी आणि सूचना देणारा अहवाल सादर केला होता. शासनाने डॉ. काकोडकर यांच्या अहवालाच्या आधारे आज हे प्रतिज्ञापत्र सादर केलं. याबाबत उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.