गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने ‘कार ऑन ट्रेन’ अर्थात आपल्या गाडीसह कोकणात येण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून त्याची सुरुवात कालपासून झाली.
काल दुपारी साडे तीन वाजता कोलाड स्थानकावरून निघालेली कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन रात्री अकरा वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नांदगाव रेल्वे स्थानकावर पोहोचली. नांदगाव आणि गोव्यात वेर्णे या दोन स्थानकावर ही सुविधा उपलब्ध असणार आहे.