गणेशोत्सवात मेट्रो प्रवाशांसाठी खुशखबर !

यंदाच्या गणेशोत्सवात मेट्रो सेवा मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणार असल्याची घोषणा एमएमआरडीएने केली आहे. येत्या २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान  अंधेरी पश्चिम  आणि गुंदवली या मार्गिकांवरील मेट्रो गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार आहेत. या दोन्ही  स्थानकांवरून शेवटची गाडी ११  ऐवजी मध्यरात्री १२ वाजता धावेल. या काळात आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी गर्दीच्या वेळेत गाड्यांची वारंवारता अधिक असेल, तर रविवारी दर १० मिनिटांनी गाडी उपलब्ध असेल.