महाराष्ट्रातल्या घरगुती, सार्वजनिक, गणेशोत्सवाला राज्याचा राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या निमित्त राज्य उत्सवगीताचं आणि ganeshotsav.pldmka.co.in यापोर्टलचं राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबईतल्या वांद्रे इथं लोकार्पण करण्यात आलं. राज्यातल्या सुमारे १८०० भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रूपये प्रमाणे भांडवली अनुदान वितरित करण्यात येणार असल्याचंही शेलार यांनी सांगितलं. यासाठी २३ ऑगस्ट पासून ६ सप्टेंबर पर्यंत mahaanudan.org या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल.