राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात शौर्यपुरस्कार सोहळा सुरु आहे. राष्ट्रपतीच्या हस्ते राजपुत रेजिमेंटच्या मेजर विजय वर्मा यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आलं. या बरोबरच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उप कमांडर, विक्रांत कुमार, इन्स्पेक्टर जेफ्री हिमंगुचलो, वायुदलाचे विंग कमांडर दासमोंद कैने, स्क्वार्डन लिडर दिपक कुमार, विशेष पोलीसअधिकारी अब्दुल लतीफ, सुभेदार संजीव सिंग जसरोटा, कमांडर पवन सिंग, सुभेदार पी पुबीन सिंग यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले.
मेजर आशिष डोंगचाक आणि पारदीप शौर्य आर्य साहब यांंना मरणोत्तर शौर्य चक्र देण्यात आलं. मराठा इन्फेंट्री चे मेजर मल्ला राम गोपल नाईडू यांना किर्ती चक्र प्रदान करण्यात आलं.