भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरोने गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेचा एक टप्पा असलेली एअर ड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. चाचणी यशस्वी झाल्याची माहिती इसरोने आपल्या समाज माध्यमावर दिली आहे. काल श्रीहरिकोटा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रात झालेली ही चाचणी इसरो, भारतीय हवाई दल, DRDO, भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली.
Site Admin | August 25, 2025 1:29 PM
गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा असलेली एअर ड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण
