डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पॅरिस ऑलिंपिकसाठी भारताच्या पथकाचं नेतृत्व गगन नारंगकडे

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताच्या पथकाचं नेतृत्व ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज गगन नारंग करणार आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं नारंग याची निवड शेफ डी मिशन (सीडीएम) म्हणून केली आहे. यापूर्वी मुष्टियोद्धा मेरी कोम या पथकाचं नेतृत्व करत होत्या. मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर या पथकाचं नेतृत्व नारंग करतील, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी दिली. या पदावर निवड झालेल्या खेळाडूवर पथकातील खेळाडूंची काळजी घेणं आणि आयोजन समितीशी समन्वय साधण्याची जबाबदारी असते. पी व्ही सिंधू ही पथकाची महिला ध्वजवाहक असेल आणि टेबल टेनिसपटू अचंता शरत कमल तिच्या सोबत असेल.