जुनी वाहनं भंगारात काढण्याचं धोरण देशाची अर्थव्यवस्था आणि पर्यावरण या दोन्हीसाठी वरदान ठरलं आहे, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ते आज नवी दिल्लीत भारतीय वाहन निर्माते महासंघाच्या ६५व्या वार्षिक संमेलनात बोलत होते.
ऑगस्ट २०२५ पर्यंत ३ लाख वाहनं भंगारात काढण्यात आली, यात १ लाख ४१ हजार सरकारी वाहनांचा समावेश होता, अशी माहिती त्यांनी दिली. ज्यांनी आपली जुनी वाहनं भंगारात काढली आहेत अशा लोकांना नव्या वाहनांच्या खरेदीवेळी जीएसटीमध्ये सवलत मिळावी अशी विनंती आपण प्रधानमंत्र्यांना केली असल्याचं त्यांनी सांगितलं.