गडचिरोलीत अतिदुर्गम भागात नव्या पोलीस ठाण्याचं उद्घाटन

गडचिरोलीमधल्या एटापल्ली तालुक्यातल्या अतिदुर्गम तुमरकोठी इथल्या  नव्या पोलीस ठाण्याचं उद्घाटन अपर पोलिस महासंचालक छेरिंग दोरजे यांच्या हस्ते झालं. गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकाचे १ हजार कमांडो, बॉम्ब शोधक  आणि  नाशक पथकाचे २१ चमू, नवनियुक्त पोलिस, ५०० पोलिस अधिकारी आणि खासगी कंत्राटदारांच्या मदतीनं हे नवं पोलिस ठाणं उभं राहिलं आहे. हे पोलिस ठाणे कोठी पोलिस ठाण्यापासून ७ किलोमीटर, तर छत्तीसगड सीमेपासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर आहे.