गडचिरोली जिल्ह्यात ६ जहाल नक्षली अतिरेक्यांनी आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या समोर आत्मसमर्पण केलं. यात तीन महिला तर तीन पुरुष नक्षल्यांनी शस्त्र ठेवली असून यात जहाल नक्षली भीमण्णा आणि त्याची पत्नी विमलाक्का यांचा समावेश आहे. यापैकी दोन विभागीय समिती सदस्य, एक कमांडर, दोन पीपीसीएम तर एक एसीएस असून या सर्वांवर ६२ लाख रुपयांचं बक्षीस होतं. पुनर्वसनासाठी शासन त्यांना ५२ लाख रुपये देणार आहे.