गडचिरोलीचा उल्लेख महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्यसरकार प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं रुबी हॉस्पीटल, वेलनेस रुग्णालय आणि महाविद्यालय संकुलाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहेरीत महिला आणि बाल रुग्णालयाचंही लोकार्पण झालं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता २ हजार ४०० आजारांचा समावेश करण्यात आला असून, त्याचा फायदा गोरगरीब नागरिकांना होईल, दक्षिण गडचिरोलीत आरोग्य व्यवस्था मजबूत झाल्यानं जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत आमुलाग्र परिवर्तन घडून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Site Admin | November 8, 2025 6:59 PM | CM Devendra Fadnavis | Gadchiroli
गडचिरोलीत विविध विकासकामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन