डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

गडचिरोलीत ट्रकच्या धडकेत झालेल्या अपघातात ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू

महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातल्या काटली गावाजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात चार विद्यार्थी एका ट्रकच्या धडकेत मृत्यूमुखी पडले. तर अन्य दोघे जखमी झाले.  त्यानंतर संतप्त नागरिकांनी हा महामार्ग रोखून धरला. या अपघातात जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी हवाईमार्गे नागपूरला नेण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्चही राज्यशासन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.