गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यामुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देंवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत.
यामध्ये गेल्या पाच वर्षात वाघ्र हल्ल्यात म्रुत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई देणं, अतिरिक्त वाघांचं स्थलांतर याचा समावेश असून याबाबतचा अहवाल तीन महिन्यात सादर करावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात, विशेषतः चार्मोशी, आरमोरी, वडसा आणि धानोरा क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत व्याघ्र हल्ल्यात सुमारे ५० पेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.