October 22, 2024 7:13 PM | Gadchiroli

printer

गडचिरोलीत पोलीस चकमकीत ठार झालेल्यांमध्ये २ मोठ्या नक्षली म्होरक्यांचा समावेश

गडचिरोली जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या २ मोठ्या म्होरक्यांचा समावेश आहे. दोघांवरही प्रत्येकी १६ लाख रुपयांचं बक्षीस होतं. या सर्वांची ओळख पटल्यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज ही माहिती दिली. जया उर्फ भुरी पदा आणि सावजी उर्फ अंकलू तुलावी हे दोघे कालच्या चकमकीत मारले गेले. हे दोघेही विभागीय समितीचे सदस्य होते. या दोघांशिवाय आणखी तिघे या चकमकीत मारले गेले, त्यांच्यावर प्रत्येकी २ लाख रुपयांचं बक्षीस होतं.