गडचिरोलीतल्या दिनेश गावडे खून प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सीपीआय माओवादी या बंदी असलेल्या संघटनेच्या दोन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य असल्याच्या संशयावरून गावडे याचा दोन वर्षांपूर्वी खून झाला होता. या प्रकरणी एनआयएनं आणखी ४ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे.
Site Admin | December 20, 2025 3:41 PM | Gadchiroli
गडचिरोलीतल्या २ नक्षलवाद्यांना अटक