गडचिरोली इथं आज ११ जहाल नक्षलवाद्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर एकंदर ८२ लाख रुपयांचं बक्षीस होतं. विभागीय समितीच्या दोन सदस्यांचाही यात समावेश आहे.
यावेळी रश्मी शुक्ला यांनी जहाल नक्षलवादी भूपती याच्या शरणागतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सी-६० कमांडोंचा सत्कार केला आणि त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं. तसंच उर्वरित नक्षवाद्यांनाही शस्त्रं टाकून आत्मसमर्पण करायचं आवाहन केलं.