गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात मोडस्के जंगलात आज दुपारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षली महिलांना ठार केलं. पोलिसांनी घटनास्थळावरुन स्वयंचलित रायफलीसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली.
गडचिरोली पोलिसांनी गेल्या २१ दिवसांत झालेल्या दोन चकमकीत ६ नक्षलवाद्यांना ठार केलं आहे.