डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 20, 2025 3:11 PM | Gadchiroli

printer

गडचिरोलीत ५ जहाल महिला नक्षलवाद्यांना अटक

अनेक हिंसक कारवायांमधे सहभागी असलेल्या पाच महिला नक्षलवाद्यांना पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी आज गडचिरोली इथून ताब्यात घेतलं. यातल्या तिघींना अटक करण्यात आली असून दोघी अल्पवयीन असल्यानं त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे.  या नक्षलवाद्यांवर एकूण ३६ लाख रुपयांचं इनाम होतं. उंगी मंगरू होयाम उर्फ सुमली, पल्लवी केसा मिडियम उर्फ बंडी आणि देवे कोसा पोडियाम उर्फ सविता अशी  अटक केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत.  त्यांच्याकडून तीन एसएलआर रायफल, एक ३०३ रायफल, दोन भरमार बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.