डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

गडचिरोलीत खनिकर्मविषयक अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाचे परदेशी विद्यापीठांबरोबर करार

खनिजसंपन्न गडचिरोली जिल्ह्यात खनिकर्म विषयाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत. स्वायत्त ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’ स्थापन करण्याबाबत गडचिरोलीचं गोंडवन विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियाचं कार्टीन विद्यापीठ यांच्यात आज यासंदर्भातल्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. मुंबईत राजभवन इथं राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला.