डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कॅनडात होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेत प्रधानमंत्री उपस्थित राहाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या शेवटी कॅनडामध्ये होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी काल दूरध्वनीद्वारे मोदी यांच्याशी संवाद साधत या परिषदेचं निमंत्रण दिलं.

 

तर मोदी यांनी या परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले तसंच मोदींनी कार्नी यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. भारत आणि कॅनडा परस्पर आदर आणि हितसंबंधांना लक्षात घेत नव्या जोमानं एकत्र काम करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.