जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या जी 20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवस दक्षिण अफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले.
वसुधैव कुटुंबकम आणि एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य या भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत अशा शिखर परिषदेत भारताची भूमिका मांडण्यात येईल असं असं प्रधानमंत्र्यांनी दौऱ्यावर जाण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
मोदी यांचा हा चौथा दक्षिण आफ्रिकेचा दौरा आहे. ग्लोबल साउथमध्ये आयोजित करण्यात येणारी ही सलग चौथी G20 शिखर परिषद आहे. जी वीस परिषदेच्या बरोबरच प्रधानमंत्री भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा केवळ जी-20 साठीच नाही तर द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाची संधी आहे, असं दक्षिण आफ्रिकेतले भारताचे उच्चायुक्त प्रभात कुमार यांनी म्हटलं आहे.