अमेरिकेत पुढच्या वर्षी फ्लोरिडा येथे होणाऱ्या जी २० शिखर परिषदेला दक्षिण अफ्रिकेला निमंत्रित केलं जाणार नाही. दक्षिण अफ्रिका जी २० परिषदेच्या सदस्य होण्याच्या योग्यतेचा नाही, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आफ्रिकन लोकांकडून होणाऱ्या मानवी हक्काच्या उल्लंघनावर बोलायला दक्षिण अफ्रिकन सरकारनं नकार दिला होता. त्यामुळे पुढच्या वर्षीचे अध्यक्ष असलेल्या अमेरिकेनं त्यांना जी -२० देशांच्या शिखर परिषदेला न बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
Site Admin | November 27, 2025 3:45 PM | G20 SouthAfrica
पुढच्या वर्षी होणाऱ्या जी २० शिखर परिषदेला दक्षिण अफ्रिकेला निमंत्रित नाही