ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी नेते जी जी पारेख यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. ते १०१ वर्षांचे होते. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील १९४२ च्या चले जाव चळवळीत जी जी पारेख यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर आणीबाणीविरोधी आंदोलनातही पारेख यांना कारावास झाला होता. युसूफ मेहरअली सेंटरच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात शेवटपर्यंत सक्रिय होते.
Site Admin | October 2, 2025 3:47 PM | G G Parekh
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी नेते जी जी पारेख यांचं निधन
