महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे यांचं काल नवी मुंबईतल्या राहत्या घरी हृदयविकाराने निधन झालं. ते ८७वर्षांचे होते. राज्य शासकीय राजपत्रित अधिकारी संघाचं त्यांनी प्रदीर्घकाळ नेतृत्व केलं. त्यांनी स्थापन केलेली ही संघटना राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी आपापली गाऱ्हाणी मांडण्याकरता उपयुक्त व्यासपीठ ठरलं. सेवानिवृत्तीनंतरही ते संघटनेचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर नेरुळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रशासनात पारदर्शकता, संवेदनशीलता, आणि जबाबदारीची भावना रुजवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचाराला बळी पडू नये, सचोटीने वागावे, यासाठी प्रबोधनावर भर दिला. त्यांच्या नेतृत्वात सुरू झालेली ‘पगारात भागवा’सारखी चळवळ अनोखी ठरली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग. दि. कुलथे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
Site Admin | April 15, 2025 2:56 PM | ग.दि.कुलथे | निधन
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दि.कुलथे यांचं निधन
