डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी मुदतवाढ

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ नोंदणीसाठी ५ जून पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षण संचालक डॉ.श्रीराम पानझाडे यांनी दिली. ही मुदत ३ जूनला संपणार होती. इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा आणि  कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय शासनानं जाहीर केला. या निर्णयामुळे होण्याऱ्या बदलानुसार विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीक्रमात बदल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, २ जूनपर्यंत १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.