येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातले इयत्ता ११ वी प्रवेश ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातला शासन आदेश आज प्रसिद्ध झाला.आतापर्यंत केवळ मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक महापालिका क्षेत्रातले ११ वी प्रवेश ऑनलाइन होत होते. इयत्ता ११ वी चे सर्व प्रवेश ऑनलाइन होणार असले तरी पहिल्या ४ फेऱ्या झाल्यानंतर वर्ग सुरू होतील.
Site Admin | February 28, 2025 7:35 PM | FYJC | Online Admission
अकरावीचे प्रवेश ‘ऑनलाइन’
