डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

नैसर्गिक आपत्तीने शेत पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी राज्य सरकारतर्फे निधी मंजूर

यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने शेत पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या एक लाख ६३ हजार ९७ हेक्टर क्षेत्रावरील एक लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांच्या शेत पिकांचं नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने पाठवला होता, या नुकसानीपोटी २२१ कोटी ८१ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
नांदेड जिल्ह्यातही सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी ८१२ कोटी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे ही रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.