डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

इंधन तेल खाणींचा शोध घेण्यासाठी १० लाख चौरस किमी समुद्री क्षेत्र खुलं !

सद्यस्थितीत दहा लाख चौरस किलोमीटर इतका सागरी प्रदेश तेल इंधनाच्या खाणींच्या शोधासाठी खुला केला असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी समाजमाध्यमांवरून दिली आहे. याबरोबरीनंच ९९ टक्के नो-गो क्षेत्र देखील अशा शोधासाठी खुलं केलं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. उद्योजक आणि उद्योग क्षेत्रातल्या दिग्गजांनी भारतातील तेल इंधन आणि वायू इंधन उत्खनन क्षेत्रातील संधी चाचपडून पाहण्यासाठी हा उत्तम काळ असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. अशा प्रत्येक उपाययोजनांमधून भारत तेल इंधन क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या बाबतीत आत्मविश्वासानं आणि टप्प्याटप्प्यानं वाटचाल करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा