डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 23, 2025 3:05 PM | FTI

printer

एफ.टी.आय.आय, सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था यांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं पुणे इथली भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात एफ.टी.आय.आय. आणि कोलकत्यातल्या सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान केला आहे. या संदर्भातली अधिसूचना शिक्षण मंत्रालयानं काल जारी केली. विद्यापीठ अनुदान आयोगानं केलेल्या शिफारशीनुसार या दोन्ही संस्थांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला गेल्याचं अधिसूचनेत म्हटलं आहे.

 

या निर्णयामुळे या दोन्ही संस्थांना आता विद्यापीठ अनुदान आयोग आणि नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार डॉक्टरेट, संशोधन आणि नवोन्मेषी शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उपक्रम राबवता येतील. याशिवाय आता या दोन्ही संस्थांचा राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा तसंच शैक्षणिक श्रेण्यांक पेढी अर्थात अकॅडमिक बँक ऑफ क्रिडिटमध्ये समावेश केला जाणार आहे. 

 

हा निर्णय नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत असून, त्यामुळे स्वायत्तता, नवोन्मेष तसंच चित्रपट आणि माध्यम विषयक शिक्षण क्षेत्रातल्या उत्कृष्टतेचा मार्ग अधिक प्रशस्त होणार असल्याचं मंत्रालयानं कळवलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.