भारतातील अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना, फळं पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या द्रव्यांच्या, कृत्रिम रंगांच्या वापरावर तसंच फळांवर मेणाचं आवरण करण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष अंमलबजावणी मोहीम राबवण्याचं आवाहन केलं आहे. कॅल्शियम कार्बाइड आदींचा बेकायदेशीर वापर रोखण्यासाठी प्राधिकरणांनं सर्व राज्ये आणि संघ प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना आणि प्राधिकरणाच्या प्रादेशिक संचालकांना फळांच्या बाजारांवर कठोरपणे लक्ष ठेवण्याची तसंच मानक कार्यपद्धतींचं पालन करण्याची सूचना केली आहे.
Site Admin | May 21, 2025 9:34 AM | FSSAI
FSSAI चं विशेष अंमलबजावणी मोहिम राबवण्याचं आवाहन
