पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी नोंदणी करण्याची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. नोंदणी पडताळणी प्रक्रियेत उशीर झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सहभाग घेता आला नाही, त्यामुळे याची मुदत वाढवण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार रब्बी हंगामातल्या सर्व अधिसूचित जिल्ह्यांसाठी नोंदणीची मुदत वाढवण्याबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला होता. या पत्राची दखल घेऊन आंबा, संत्रा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.
Site Admin | December 9, 2025 7:14 PM | Fruit Crop Insurance Scheme
फळपीक विमा योजनेत नोंदणी करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ