October 11, 2024 1:38 PM

printer

स्वातंत्र्यसैनिक जयप्रकाश नारायण यांची जयंती देशाच्या विविध भागात साजरी

स्वातंत्र्यसैनिक, लोकनायक जयप्रकाश नारायण यांची जयंती आज देशाच्या विविध भागात साजरी होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे जयप्रकाश यांना अभिवादन केलं.

 

जयप्रकाश नारायण यांनी समाज आणि देशासाठी दिलेल्या योगदानाची आठवण प्रधानमंत्र्यांनी केली. जयप्रकाश यांचे विचार अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील असं प्रधानमंत्री म्हणाले.