January 6, 2026 6:18 PM | Fraud

printer

कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश

ऑनलाइन परकीय चलन आणि सोन्याचा व्यवहार करणाऱ्या योजनांमध्ये शेकडो लोकांची २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. विविध राज्यांमधल्या ५० पेक्षा जास्त प्रकरणांशी संबंधित सात जणांना अटक केल्याची माहिती मीरा भाईंदर-वसई विरारचे पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली. फसवणूक करणाऱ्यांनी विवाह जुळवणाऱ्या वेबसाइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे विश्वास निर्माण करून पीडितांना फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक करायला प्रवृत्त केल्याचं त्यांनी सांगितलं. या टोळीचे सूत्रधार देशाबाहेरून हा कारभार चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.