बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेत भारताच्या पाच बाद १६४ धावा

ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्याच्या आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सर्व बाद ४७४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजी गडगडली. विराट कोहली आणि के एल राहुल हे दोघं अनुक्रमे ३६ आणि २४ धावांवर बाद झाले. रोहित शर्मा अवघ्या तीन धावा करू शकला तर आकाशदीप शून्यावर बाद झाला. सलामीला उतरलेल्या यशस्वी जयस्वालने ८२ धावा केल्या. या धावांच्या बळावर आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या पाच बाद १६४ धावा झाल्या होत्या. दरम्यान, माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी भारतीय संघाचे खेळाडू दंडावर काळ्या फिती बांधून खेळत होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.