हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’ची चौथी यादी जाहीर

आप अर्थात आम आदमी पार्टीनं आज हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली असून  त्यात २१ उमेदवारांचा  समावेश आहे. या पक्षानं सोनिपतमधून देवेंदर गौतम, गुरगावमधून निशांत आनंद,  अंबाला मधून राज कौर गिल तर कर्नाल मधून सुनील बिंदल यांना उमेदवारी दिली आहे.