सप्टेंबर २०२५ या महिन्यात चारचाकी गाड्यांच्या विक्रीत ४ टक्के वाढ झाली आहे. दुचाकींची विक्री ७ टक्के वाढली असल्याचं सोसायटी ऑफ इंडीयन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स या वाहनउत्पादक संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे. या महिन्यात ३ लाख ७२ हजार ४५८ चारचाकी गाड्या विकल्या गेल्या तर २१ लाख ६० हजार ८८९ दुचाकी वाहनं विकली गेली.
Site Admin | October 15, 2025 3:26 PM | Four-wheeler | sales up 4% in September
सप्टेंबर महिन्यात चारचाकी गाड्यांच्या विक्रीत ४% वाढ
