गडचिरोली जिल्ह्यात भामरागड इथं कोपर्शी गावाजवळ आज पोलिसांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. यात तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. नक्षलवादी काही घातपात करायच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या भागात मोहीम सुरू केली होती.
आज नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराच्या प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चौघेजण ठार झाले. आठ तास ही चकमक चालली. पोलिसांनी घटनास्थळावरून काही शस्त्रं जप्त केली आहेत. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.