डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 23, 2024 8:41 PM

printer

मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन

मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते आज झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती उज्जल भुयान, न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि इतर यावेळी उपस्थित होते.

भारताची लोकशाही बळकट करण्यात न्यायव्यवस्थेची भूमिका महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. न्यायव्यवस्था हे लोकांचं आशास्थान आहे. आरोपीला तत्काळ शासन व्हावं अशी नागरिकांची अपेक्षा आहे आणि त्यासाठी सक्षम न्यायव्यवस्था उभी करण्याचे प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवेत. यात शासन कुठंही कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.