डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सिरपूर कागजनगर इथं ३ हजार ९०० कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी

परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी तेलंगणामधल्या सिरपूर कागजनगर इथं ३ हजार ९०० कोटी रुपयांच्या विकासकामांची पायाभरणी केली. तेलंगणातल्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले.

 

शेतीच्या विकासासाठी महामार्गालगत अमृत सरोवर विकसित करणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. पुढच्या तीन ते चार वर्षात राज्यात दोन लाख कोटी रुपयांचे रस्ते प्रकल्प सुरू होणार आहेत, यामुळे मुलुगू आणि कोठगुडम जिल्ह्यातून हैदराबादला दळणवळण सुलभ होईल, असंही गडकरी म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.