हवाई गुणवत्ता निर्धारण महासंचलनालयाचा आज स्थापना दिवस

हवाई गुणवत्ता निर्धारण महासंचलनालयानं आज देशभरात स्थापना दिवस साजरा केला. नाशिक जिल्ह्यात ओझरमध्ये यानिमित्त विशेष पंधरवड्याचं आयोजन झालं. HAL मधल्या कार्यालयाकडून यापूर्वी रशियन विमानांच्या दर्जावर देखरेख ठेवली जात होती. आता पश्चिमी देशातून आलेल्या विमानांच्या देखरेखीचं काम आलं आहे. या कार्यालयातले कर्मचारी यासाठी सज्ज असल्याचं अतिरीक्त महासंचालक सतिश कुमार यांनी सांगितलं.