अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष डिक चेनी यांचं आज निधन झालं. चेनी यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. १९९१ मध्ये झालेल्या आखाती युद्धात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळात २००१ ते २००९ या कालावधीत उपराष्ट्रपती पद भूषवलं होत. २००३ मध्ये झालेल्या इराक युद्धाचे ते समर्थक होते.
Site Admin | November 4, 2025 7:57 PM | Dick Cheney
अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष डिक चेनी यांचं निधन