सीरीयावर बंडखोरांचा ताबा, माजी राष्ट्राध्यक्ष असद यांनी घेतला मॉस्कोत आश्रय

सीरियामध्ये बंडखोरांनी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवल्यानंतर, माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद आणि त्यांच्या कुटुंबियांनी रशियात मॉस्कोमध्ये आश्रय घेतल्याच्या बातम्यांची क्रेमलिननं पुष्टी केली आहे. मानवताधारित दृष्टीकोनानं रशियानं असद यांना प्रवेशाची परवानगी दिली आहे. रशियाच्या युक्रेनवरील लष्करी हल्ल्याला असद यांनी पाठिंबा दर्शवला होता. दरम्यान, अबू- मोहम्मद अल जोलानी यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरांनी अनेक वर्षांची असद यांची सत्ता उलथवून लावत संपूर्ण इस्लामिक राष्ट्रासाठी विजयाची घोषणा केली आहे. तर सीरियाचे माजी पंतप्रधान मोहम्मद गाझी अल जलाली यांनी मुक्त निवडणुका घेण्याचे आवाहन केलं आहे. सीरियाच्या राजकीय परिस्थितीच्या वेगवान घडामोडींमुळे स्थानिक स्थिरतेविषयी इतर अरब राष्ट्रांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.