August 20, 2024 3:51 PM | Rajiv Gandhi

printer

माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र सद्भावना दिवसाचे कार्यक्रम

देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांची आज ८० वी जयंती असून हा दिवस सद्‌भावना दिवस म्हणून पाळला जातो.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही समाजमाध्यमावरून राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत वीर भूमी या राजीव गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पांजली अर्पण केली.

मुंबईत राजभवनात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली. राजभवनातील अधिकारी, कर्मचारी, मुंबई पोलिस दलाचे अधिकारी आणि जवानांना तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना सद्भभावनेची प्रतिज्ञा दिली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज, मंत्रालयात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सद्भवना दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना उपमुख्यमंत्र्यांनी समाजात एकता, शांतता, बंधुता, सामाजिक सद्भावना कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची शपथ दिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.