भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांचं आज सकाळी नाशिक इथे त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. पेठ-सुरगाणा या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उतरलेले चव्हाण आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आधी काँग्रेसकडून निवडणूक लढवत ते खासदार झाले. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतरही ते सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी जिल्हा परिषदेतली विविध पदंही भूषवली होती. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता सुरगाणा तालुक्यातल्या प्रतापगड इथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.